गडचिरोली जिल्हयातील दिव्यांग व्यक्तिंसाठी निःशुल्क जयपूर फुट /
कॅलीपर्स, कृत्रिम हात, साहित्य साधने मोजमाप शिबीर
09 जानेवारी 2024 ते 11 जानेवारी 2024
आलापल्ली, कुरखेडा, गडचिरोली या तीन ठिकाणी
गडचिरोली, दि.06: सन 2011 च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्हयामध्ये विविध प्रवर्गातील एकूण 22,000 लोक दिव्यांग आहेत. या व्यक्तिमध्ये अस्थीव्यंग, दृष्टिदोष असणारे, कर्णदोष असणारे, अंध व अल्पदृष्टी असणारे आणि मानसिक दिव्यांगत्व असे दोष असणारे 75 टक्के दिव्यांग व्यक्ति ग्रामिण विभागात राहतात. याकरीताच जिल्हा परीषद, गडचिरोली दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, 2016 अन्वये समान संधी व संपूर्ण सहभाग या धोरणात्मक निकषाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग व्यक्ति आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकरिता विविध प्रकारचे पुनर्वसनात्मक शिक्षण व प्रशिक्षनात्मक कार्यक्रम विविध संस्थाच्या सहकार्याने आयोजित करीत असते आणि दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रातील विविध विषयांवर माहिती व अद्यावत माहिती देत असते.
दिव्यांग व्यक्तिंना समाजाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी गरजेनुसार पुनर्वसनात्मक सहाय्यभूत सेवा विहीत कालावधीत मिळाव्यात व प्रकल्पाअंतर्गत एकही दिव्यांग व्यक्ति सहाय्यभूत सेवांपासून वंचित राहू नये या दृष्टीने जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना पूनर्वसनात्मक सहाय्यभूत सेवा देण्याकरिता जिल्हा परीषद, गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्या निदर्शनाखाली रत्न निधी चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहयोगाने व जिल्हा समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग जि.प. गडचिरोली आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केन्द्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक दायित्व निधीअंतर्गत त्याचाच एक भाग म्हणून रत्न निधी चॅरीटेबल ट्रस्ट शाखा मुंबई यांचे सहकार्याने जिल्ह्यातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना निःशुल्क आवश्यक, साहित्य व साधने मोजमाप कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग व्यक्तिंकरिता दिनांक 09 जानेवारी 2024 रोजी आलापल्ली, 10 जानेवारी 2024 रोजी कुरखेडा, जि. गडचिरोली अणि 11 जानेवारी 2024 रोजी गडचिरोली येथे जिल्हयातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तिंच्या आवश्यकतेनुसार आवश्यक असणारे जयपूर फुट कृत्रिम अवयव व साहित्य, साधने निःशुल्क मोजमाप शिबीर. स्थळ : आलापल्ली, कुरखेडा, व गडचिरोली येथे सकाळी 9 ते दुपारी २ वाजेपर्यत आयोजित करण्यात येत आहे. संजय मिणा, जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात व श्रीमती आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली यांच्या संकल्पनेतून आणि राजेंद्र भोयर अतिरिक्त
मुख्यकार्यकारी अधिकारी, गडचिरोली, जिल्हयातील सर्व पंचायत समित्यांमधील गटविकास अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, शिक्षण अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्यावतीने ग्रामिण व शहरी भागातील सर्व दिव्यांग व्यक्तिंना आवश्यक साहित्य व साधने विनामुल्य मिळावीत याकरीता दिव्यांग व्यक्तिंकरीता मोजमाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरात जिल्हयातील अस्थिव्यंग, दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क जयपूर फुट कृत्रिम अवयव, साहित्य साधनांसाठी रत्ननिधी चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्याद्वारा तपासणी व मोजमाप करण्यात येईल. दिव्यांग व्यक्तिंच्या तपासणी व मोजमापानंतर त्यांना जयपुर फुट, कॅलीपर्स, कृत्रीम हात, इ. एकूण 300 लाभार्थ्यांना साहित्य साधने निःशुल्क मोजमाप प्रथम टप्यात करण्यात येईल. गडचिरोली जिल्हयातील दिव्यांग (दिव्यांग) व्यक्तिंसाठी निःशुल्क जयपूर फुट साहित्य व साधने मोजमाप कार्यक्रम वेळापत्रक(दिनांक 09 जानेवारी 2024 ते 11 जानेवारी 2024)
अ.क्र शिबिर दिनांक शिबीर स्थळ सहभागी तालुके
1 09/01/2024 प्राथमिक आरोग्य केंद्र, ता आलापल्ली (आयुष्यमान भारत रुग्णालय, जि. गडचिरोली ) अहेरी, आलापल्ली, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा.
2 10/01/2024 पंचायत समिती कार्यालय परिसर, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी
3 11/01/2024 जिल्हा सामान्य रुग्णालय,( सरकारी दवाखाणा), मुल रोड गडचिरोली धानोरा, मुलचेरा, चामोर्शी, गडचिरोली.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता व जिल्हयातील सर्व दिव्यांग (दिव्यांग)व्यक्तिंना सदर कॅम्पचा लाभ मिळण्याकरीता, जिल्हा समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग म.न.पा. आणि जि.प. गडचिरोली व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र गडचिरोली येथील सर्व स्तरावरील कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच दिव्यांग क्षेत्रात काम करणा-या सेवाभावी संस्था, विशेष मुलांच्या शाळा, पालक संघटना व पालक यांनीही सदर कॅम्प यशस्वी शिक्षण करण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे. तरी या योजनेचा लाभ घेऊ इच्छीणा-या गडचिरोली जिल्हयातील गरजू दिव्यांग व्यक्तिंनी खालील आवश्यक कागद पत्रासह उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
आवश्यक कागदपत्रेः 1) दिव्यांगत्वाचे वैद्यकिय प्रमाणपत्र, 2) रहीवासी दाखला,
3) 2 रंगीत पासपोर्ट साईज फोटो, 4) उत्पन्नाचा दाखला
अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, गडचिरोली, जिल्हा शासकीय सामान्य
रुग्णालय परिसर, कॉम्प्लेक्स, मूल रोड, गडचिरोली – ४४२६०५ (फोन नं. 07132-222766, मोबाईल
क्र. ७३८७०९५०७७, ७५५८४९५१४०), येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा व या योजनेचा
लाभ घ्यावा. असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली श्रीमती आयुषी सिंह यांनी कळविले आहे.