जिल्हयातील अस्थीव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क आवश्यक,
साहित्य व साधने मोजमाप कार्यक्रमाचे आयोजन
गडचिरोली, दि.05:ग्रामिण व शहरी भागातील सर्व दिव्यांग व्यक्तिंना आवश्यक साहित्य व साधणे विनामुल्य मिळावित याकरीता दिव्यांग व्यक्तिंकरीता मेाजमाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहयोगाने व संजय मीणा जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात व श्रीमती आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गडचिरोली यांच्या संकल्पनेतुन आणि राजेंद्र भुयार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली तसेच जिल्हृयातील सर्व पंचायत समिती मधील गटविकास अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, शिक्षण अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या वतीने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंन्द गडचिरोली यांच्या सयुंक्त विद्यमानाने, रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट शाखा मुंबई यांचे सहकार्याने जिल्हयातील अस्थीव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क आवश्यक, साहित्य व साधने मोजमाप कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग व्यक्तीकरीता दिनांक 09 जानेवारी 2024 रोजी आलापल्ली, 10 जानेवारी 2024 रोजी कुरखेडा, जिल्हा गडचिरोली आणि 11 जानेवारी 2024 रोजी गडचिरोली येथे जिल्हयातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तिंच्या आवश्यतेनुसार आवश्यक असणारे जयपुर फुट कृत्रिम अवयव व साहित्य, साधने नि:शुल्क मोजमाप शिबीर स्थळ आलापल्ली, कुरखेडा व गडचिरोली येथे सकाळी 09.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यत आयोजित करण्यात येत आहे.
(दिनांक 09 जानेवारी 2024 ते 11 जानेवारी 2024)
अ.क्र शिबिर दिनांक शिबीर स्थळ सहभागी तालुके
1 09/01/2024 प्राथमिक आरोग्य केंद्र, ता आलापल्ली (आयुष्यमान भारत रुग्णालय, जि. गडचिरोली ) अहेरी, आलापल्ली, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा.
2 10/01/2024 पंचायत समिती कार्यालय परिसर, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी
3 11/01/2024 जिल्हा सामान्य रुग्णालय,( सरकारी दवाखाणा), मुल रोड गडचिरोली धानोरा, मुलचेरा, चामोर्शी, गडचिरोली.