नगर माळी समाज सिंदेवाही वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई जोतिराव फुले जयंती उत्सव साजरा
कार्यक्रम सुरवात भारत माता चौक येथून सिंदेवाही नगरातील मुख्य चौकातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा. डॉ. विलास मानकर, आरोग्य अधिकारी, प्रा.आ.केंद्र मोहाळी नले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कु. राजश्री वसाके, शिक्षका, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. सौ. तनुजा घाडगे, कृषी सहाय्यक, प्रमुख अतिथी मा. सौ. श्वेताताई मोहुर्ले, नगरसेविका नगरपंचायत सिंदेवाही-लोनवाही, मा. डाॅ. सौ. कल्पनाताई मानकर, मा. सौ. गिताताई वाढई, शिक्षिका, मा. सौ. निमंत्रिताताई कोकोडे, मा. सौ. प्रतिभाताई मोहुर्ले, अधिवक्ता होते. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्सव निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा, वैयक्तिक व सामुहिक नृत्य, समुह नृत्य, नक्कल स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री विलास मानकर यांनी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे जिवन चरित्रावर व कार्यावर प्रकाश टाकले.
प्रमुख मार्गदर्शक सौ. तनुजा घाडगे यांनी शेती व्यवसाय सोवत शेतीपूरक व्यवसाय महिलांसाठी प्रबोधन करण्यात आले..
कार्यक्रमाचे अध्यक्ष कु. राजश्रीताई वसाके यांनी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी अडचणींवर मात करून शिक्षणाचा हक्क मिळवून दिले. त्यामुळेच त्याचे विचार साहित्याचे आचरण करून तात्यासाहेब महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रम प्रस्ताविक सौ. मेघाताई निकोडे, सूत्रसंचालन कु. तेजस्विनी मोहुर्ले, श्री गुरू शेंडे सर तर आभार सौ. हर्षनाताई महाडोरे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यास श्री क्रिष्णा आदे, श्री स्वप्नील गुरनुले, श्री दिनेश वाढई, सौ. विद्याताई वाढई, समाजातील महिला व युवक मंडळी अथक परिश्रम घेतले.