पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत आज एक दिवसीय कार्यशाळा
शेंकडों शिक्षक व पोलीस पाटील यांची उपस्थिती
पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत आज दिनांक 04/01/2024 रोजी पोलीस स्थापना दिन सप्ताह (रेझिंग डे) निमित्ताने पंचायत समिती सभागृह सिंदेवाही येथे जिल्हापरिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक व पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येत असलेले पोलीस पाटील यांची T.E.E.N.S. एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली.
सदर कार्यशाळेचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री सुमित जोशी सर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर तथा दिवाणी न्यायाधीश कस्तर चंद्रपूर यांनी भूषविले. मार्गदर्शन करताना सरांनी अल्पवयीन मुला-मुलीन संबंधाने वाढणारे गुन्हे तथा पोस्को कायद्याअंतर्गत घडणाऱ्या गुन्ह्यांबद्दल मार्गदर्शन केले. मार्गदर्शक म्हणून लाभलेले मा. श्री इरपाते सर पोलीस उपनिरीक्षक कम्युनिटी पोलिसिंग शाखा चंद्रपूर, यांनी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत चालणाऱ्या पोलीस काका, पोलीस दीदी तसेच अल्पविन मुला – मुलीनं वर लैंगिक अत्याचारा संबंधाने मार्गदर्शन केले. मा. श्री. मुजावर अली सायबर पोलीस ठाणे चंद्रपूर त्यांनी वाढत चाललेल्या सायबर गुन्हे हनी ट्रॅप, फेक कॉल वरून पैशाची उचल करणे, फेसबुक इंस्टाग्राम आयडी हॅक झाल्यानंतर काय उपाययोजना करावी या संबंधाने मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती मा श्री. शहाजी भोसले j.m.f.c. कोर्ट सिंदेवाही. मा. श्री. सुकरे संवर्ण विकास अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही यांनी दर्शविली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा श्री. तुषार चव्हाण ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे सिंदेवाही यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पो. अ. रणधीर मदारे पोलीस ठाणे सिंदेवाही यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा श्री सागर महल्ले पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाणे सिंदेवाही यांनी केले.
सदर कार्यक्रमांमध्ये 150 ते 160 शिक्षक व 60 ते 65 पोलीस पाटील बंधू व भगिनी उपस्थित होते