“पोलीस रेझिंग सप्ताह निमीत्त पोलीस पाटील व शेतकरी मार्गदर्शन मेळावा”
दिनांक ०४/०१/२०२४ रोजी पोलीस बहुउद्देशीय हॉल पोलीस मुख्यालय भंडारा येथे भंडारा जिल्हा पोलीस दलाचा “रेझीग सप्ताह” निमीत्त मा. लोहित मतानी पोलीस अधीक्षक, भंडारा, यांचे अध्यक्षतेखाली, ईश्वर कातकडे अपर अधीक्षक भंडारा याचे उपस्थितीत पोलीस पाटील व शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजीत करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते राजेशकुमार थोरात पोलीस निरीक्षक साकोली यांनी भंडारा जिल्हयातील चारही विभागातील आलेले पोलीस पाटील व शेतक-यांना मार्गदर्शनपर केले. शेतकरी मेळाव्या दरम्यान शेतकरी कसा असावा. त्याने कोणत्या प्रकारे शेतीचे उत्पन्न घेतले पाहीजे. शेत-यांनी शेतीच्या कामाकरीता कसे लोन घेणे सावकाराकडून न घेतात बँकेमार्फत लोन घेणे. शेतकरी आत्महत्या करतात ते करण्यास रोखणे, शेतावर किंटक नाशक चावल्यास रुग्नालयात जावुन लस घेणे. जेणेकरुन बचाव होईल. मुला मुलींकडे आपल्या पाल्याकडे लक्ष देणे. मुले- मुली पळुन जातात., तसेच व्यसन दारु, तबांखु, खर्रा खातात त्याकडे लक्ष देणे.
मा. लोहित मतानी पोलीस अधीक्षक, भंडारा, यांनी शेतकरी मेळावा व पोलीस पाटील यांना मार्गदर्शनपर सांगीतले की, गावपातळीवर पोलीस पाटील प्रशासनाचा पोलीस असतो. त्याने यांनी कोणते कर्तव्य बजवायचे असते. पोलीसांची मदत केली पाहीजे. गावात बेवारीस वस्तु आढळल्यास, गावात येणा-या अनोळखी इसम आल्याची माहिती लगेच पोलीस स्टेशनला कळवावे. मंदीर, मज्जीद, जबरी चोरी, घरफोडी, याकडे लक्ष ठेवणे. तसेच मंडई, जलसा, नाटक गावात होत असल्यास पोलीस स्टेशनला त्याची माहिती देणे. पोलीसांना वेळोवेळी मदत करणे. भंडारा जिल्हा हा शेतीप्रदान जिल्हा आहे. तसेच महिला आदर केला पाहीजे. तसेच पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचे घेण्यात आलेल्या PLAY With POLICE कबड्डी खेळाडूना प्रथम, व्दितीय, तृतीय शिल्ड व पारीतोषीक देण्यात आले.
यावेळी श्री. नितीन चिचोळकर स्थागुशा भंडारा, सहायक पोलीस निरीक्षक श्री. अभिजीत पाटील ठाणेदार वरठी, राखीव पोलीस निरीक्षक श्री. रघुनाथ चौधरी, राखीव पोलीस उपनिरीक्षक प्रधान, पोलीस बॅन्ड पथक, पोलीस बॉम्ब शोधक, श्वान पथक, पोलीस सायबर विभागातील, पोलीस कवायत निर्देशक येथील अंमलदार व शेतकरी व पोलीस पाटील हजर होते.