क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व मतदार जनजागृती कार्यक्रम
भंडारा दि.3 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती पर्वावर मतदार जनजागृती कार्यक्रम भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण शाळा,कॉलेज मधून मतदारांना मतदानाचे महत्त्व सांगून, मतदानाच्या वेळी हाताळायच्या संपूर्ण बाबींविषयी माहिती देऊन,मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असणारे विविध पुरावे कोणते यांची माहिती विषद करून यशस्वीपणे मतदार जनजागृती करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी समस्त शाळा,कॉलेजमधून प्रथम स्त्री शिक्षिका व स्त्री उद्धारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याची महती विषद करण्यात आली.
मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत सांगितलेली माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांपर्यंत पोहचवावी व मतदारांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी असेही आवर्जून सांगण्यात आले.
जयंती पर्वावर भंडारा जिल्हात मतदार जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माननीय जिल्हाधिकारी व उप-जिल्हाधिकारी निसाळ साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे तसेच नोडल अधिकारी श्री रविंद्र सलामे साहेब E.O. (माध्य)यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सुधाकर देशमुख विकास हायस्कुल खरबी, श्री फसाटे,श्री झुरमुरे,श्री मरगडे यांचे सहकार्य लाभले.