राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा : दुसऱ्या दिवसाअखेर महाराष्ट्र 5 सुवर्ण पदकासह आघाडीवर
चंद्रपूर दि. 30 : बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत 28 व 29 डिसेंबर या पहिल्या दोन दिवसाच्या खेळात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण पदक, दोन रौप्य व दोन कास्य असे एकूण नऊ पदकांची कमाई करत पदक तालिकेत आघाडी घेतली आहे. तर केरळचे खेळाडू चार सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्य असे एकूण 12 पदकासह दुसऱ्या स्थानावर आणि हरियाना 3 सुवर्ण, 4 रौप्य व 1 कास्य पदकासह तीसऱ्या स्थानावर आहेत.
आतापर्यंत एकूण 10 संघानी सुवर्ण पदकांची कमाई केली
तर 15 संघांनी पदक तालिकेत स्थान मिळवले आहे.
कालपर्यंतच्या निकालानुसार उत्तरप्रदेश एकूण 8 पदके, राजस्थान 6 पदके, तामिळनाडू 5, छत्तीसगड 1, भारतीय शालेय परिषद 1, लक्षद्विप 1, मध्य प्रदेश 1, कर्नाटक 6, आंध्र प्रदेश 2, केंद्रीय विद्यालय 1, उत्तराखंड 1 पश्चिम बंगालने 1 पदक प्राप्त करून पदक तालिकेत स्थान मिळवले आहे. अद्याप एक दिवसाचा खेळ बाकी असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.