सारथी संस्थेकडून वस्तीगृहासाठी अर्ज आमंत्रित 8 जानेवारीपर्यंत अर्ज करावे

सारथी संस्थेकडून वस्तीगृहासाठी अर्ज आमंत्रित

8 जानेवारीपर्यंत अर्ज करावे

 

              भंडारा,दि.29 : छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था,पुणे या संस्थेचे विभागीय कार्यालय नागपूर येथे वनामती परिसरात सुरु करण्यात आले आहे.सारथी मार्फत छत्रपती शिवाजी महाराज जिल्हास्तरीय वसतिगृह संकुल योजना अंतर्गत खाजगी नोंदणीकृत संस्थाकडून महाविद्यालयातील मराठा,कुणबी या लक्षित गटातील मुले मुलीसाठी जिल्हानिहाय वसतिगृह चालविण्यासाठी विभागातील सर्व जिल्हयाकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहे.

           तरी नागपूर विभागामधील सर्व सहा जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्थांनी जास्तीत जास्त प्रमाणात प्रतिसाद घ्यावा,म्हणजे शासनाच्या या योजनेचा मराठा कुणबी या लक्षित गटातील मुला-मुलींना फायदा घेणे शक्य होईल.असे आवाहन उपव्यवस्थापकीय संचालक,सारथी,विभागीय कार्यालय,नागपूर यांनी केलेले आहे.

          या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख मुदतवाढीसह ही वर्धा जिल्ह्याकरिता 6 जानेवारी, 2024,नागपूर, चंद्रपूर,गडचिरोली व भंडारा जिल्ह्याकरिता 8 जानेवारी,2024 तसेच गोंदिया जिल्ह्याकरिता 11 जानेवारी,2024 अशी आहे.या योजनेची सविस्तर माहिती www.sarthi.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

अर्ज दाखल करण्याचा पत्ता खालील प्रमाणे देण्यात येत आहे.

               उपव्यवस्थापकीय संचालक,सारथी नागपूर शहर,

               विभागीय कार्यालय,सारथी नागपूर,

               पत्ता:-वनामती,नागपूर परिसर येथील इमारत शरद व ग्रीष्म,व्ही.

               आय.पी.रोड,धरमपेठ,नागपूर-440010

               दूरध्वनी क्रमांक :- 0712-2992878

               ई-मेल आयडी :- divnagpursarthi@gmail.com

               व भ्रमनध्वनी क्रमांक :- 0712-2992878