ईच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी 8 जानेवारी,2024 पर्यत
कृषि अधिकारी कार्यालयात आपले अर्ज सादर करावा
भंडारा,दि.29: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियांनातील मनुष्यबळ विकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयातील 25 शेतकऱ्यांना राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करावयाचा असून फलोत्पादन शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा,आवड निर्माण करण्याच्या हेतुने तसेच फलोत्पादन पिकांची लागवड,काढणी,प्रतवारी,हाताळणी,प्रक्रिया उद्योग,आधुनिक लागवड तंत्रज्ञान व काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल ज्ञान उपलब्ध करुन देणे या बाबीसाठी शेतकऱ्यांचा दौरा आयोजित करावयाचा आहे.
या दौऱ्यामध्ये फळबाग,फुले लागवड,भाजीपाला लागवड,विदेशी फळपिक लागवड,फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योग व नियत्रित शेतीमध्ये भाजीपाला व फुले लागवड या बाबींचा प्रशिक्षण व भेटीमध्ये समावेश असून सदर प्रशिक्षणासाठी सहभाग घेण्यास ईच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच वरील बाबींचा अवलंब करण्यास ईच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी 8 जानेवारी,2024 पर्यत संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा उपविभागीय कृषि अधिकारी यांचे कार्यालयात 7/12,8 अ,आधारकार्ड व छायाचित्रासह अर्ज सादर करावा,असे आवाहन जिल्हा कृषि अधिक्षक कृषि अधिकारी श्रीमती.माने यांनी कळविले आहे.