जागतिक कौशल्य स्पर्धा – 2024
जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
गडचिरोली, दि.22: जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. जगभरातील 23 वर्षाखालील तरूणाकरीता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा जिल्हास्तरीय, विभाग स्तरावर, राज्यस्तरीय व देश पातळीवर जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन केल्या जाते. विविध स्तरावरावरील निवड झालेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यांत येतात. त्यानुषंगाने 2024 – करीता जागतिक कौशल्य स्पर्धा, फ्रांस ( ल्योन ) येथे माहे सप्टेंबर – 2024 मध्ये आयोजित होणार आहे. त्याकरीता गडचिरोली जिल्हयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पॉलिटेक्नीक कॉलेज, कौशल्य प्रशिक्षण संस्था, सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था, फाईन आर्टस कॉलेज, व कॉलेजेस मधील इच्छुक विद्यार्थ्यांनी जागतिक कौशल्य स्पर्धेकरीता सहभागी होण्यासाठी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळाच्या लिंकवर भेट देवून दिनांक 07 जानेवारी 2024 पर्यंत जास्तीत जास्त नांव नोंदणी करावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त यांनी केले आहे.