भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे उदघाटन
राज्यातील २७४ स्पर्धकांचा सहभाग
चंद्रपूर १९ डिसेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १९ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान ४ दिवसीय भिंतीचित्र महोत्सव साजरा केला जात असुन याचे रीतसर उदघाटन आज सकाळी ९ वाजता जिल्हा स्टेडियम येथे आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर महोत्सवात भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग, क्रीएटीव्ह पेंटींग या ३ स्पर्धा घेण्यात येत असुन शहरातील जिल्हा स्टेडियम,चांदा पब्लीक स्कूल परिसर, सेंट मायकल स्कूल,प्रियदर्शिनी चौक ते वरोरा नाका इत्यादी परिसराचे सौंदर्यीकरण त्यांच्याद्वारे केले जाणार आहे. लवकरच विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भिंतीचित्र महोत्सवातील स्पर्धकांना देशभरातील लोकांना आपल्या कलेचा परिचय देण्याची संधी प्राप्त होत आहे.
स्पर्धेत मुंबई,नागपूर,सांगली,सोलापूर,
उदघाटन प्रसंगी स्पर्धकांना स्पर्धा साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपअभियंता विजय बोरीकर,डॉ.अमोल शेळके, सहायक आयुक्त सचिन माकोडे,नरेंद्र बोभाटे,संतोष गर्गेलवार,चैतन्य चोरे,विकास दानव, साक्षी कार्लेकर, मनपाचे अधिकारी कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने स्पर्धक व नागरिक उपस्थीत होते.
मागील वर्षी झालेल्या स्पर्धेत सहभाग घेऊन चित्रांद्वारे संवाद साधणाऱ्या भिंती आपण तयार करून दाखविल्या आहेत. शहरात थंडीचा कडाका वाढत आहे अश्या वेळेस राज्यातल्या एका टोकावरच्या शहरात येऊन आपण स्पर्धेत भाग घेत आहेत ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. संपुर्ण राज्यातील कलावंतांच्या कलांनी चंद्रपूर शहराच्या सौंदर्यीकरणात निश्चितच वाढ होईल अशी आशा करतो – आयुक्त विपीन पालीवाल