दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण
चंद्रपूर दि. 18 : समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण उपक्रमातंर्गत गट साधन केंद्र, पंचायत समिती, चंद्रपूरतर्फे
जिल्हा परीषद, महानगरपालिका व खाजगी माध्यमाच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. सदर साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन भवानजीभाई चव्हाण हायस्कुल, चंद्रपूर येथे करण्यात आले होते.
यावेळी, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी निवास कांबळे, शाळेचे प्राचार्य श्री. तन्नीरवार, समावेशित शिक्षण तज्ञ रत्नाकर निब्रड, फिजीओथेरपिस्ट डॉ. सुनिता कुशवाह, विशेष शिक्षक प्रकाश कोटनाके, दिवाकर नागदेवते, राजेंद्र हावरे, विशेष शिक्षिका प्रतिभा आष्टनकर सोनू आमटे, आरती राजगडकर, राजश्री पिपंळकर आदी उपस्थित होते.
या शाळांमध्ये बहुविकलांग, सेरेबल पालसी, कर्णबधीर, बौद्धीक अक्षम व अस्थिव्यंग अशा विविध प्रकारातील दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहे. अशा विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रक्रिया सुलभ होण्यासाठी ट्रायसीकल, व्हिलचेअर, मॉडिफॉय चेअर, श्रवणयंत्र व रोलेटर आदी प्रकारच्या साहित्याचे वितरण दिव्यांग विद्यार्थ्यांना करण्यात आले.