पोक्सो गुन्हयातील आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा
दिनांक 2 ऑक्टोंबर, 2020 रोजी पोलीस स्टेशन गोंडपिपरी हद्दीतील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या 24 वर्षीय आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे अपराध कमांक 235/2020 कलम 376 (2), (अ), 506 भादंवि सहकलम 4, 5 (1) व 6 लैंगिक गुन्हयापासुन बालकांचे संरक्षण कायदा 2012 अन्वये गुन्हा नोंदविण्यात येवुन गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रेखा काळे यांनी करुन आरोपीविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असता आज दिनांक 16/12/2023 रोजी कोर्ट विद्यमान श्री अ.व्हि. दिक्षीत, विशेष सत्र न्यायाधिश चंद्रपूर यांचे न्यायालयात आरोपी 24 वर्षीय कमलाकर भाऊजी राऊत यास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
सदर गुन्हयात आरोपीस शिक्षा ठोठावण्यास सरकार तर्फे सहा. सरकारी अभियोक्ता श्रीमती स्वाती देशपांडे आणि पैरवी अधिकारी म्हणुन पोहवा / 2372 निलरत्न उराडे पोस्टे गोंडपिपरी यांनी कामगिरी बजावली आहे.