शालेय अथवा एकविध क्रीडा संघटनांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी व प्राविण्यप्राप्त खेळाडूंनी नोंदणी करणेबाबत
गडचिरोली, दि.15 : गडचिरोली जिल्हयातील सर्व शाळा, महाविद्यालय तथा क्रीडा मंडळातील खेळाडूंना कळविण्यात येते की, सन 2022-23 व सन 2023-24 या सत्रात शालेय क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग किंवा प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंनी तसेच अधिकृत एकविध क्रीडा संघटनांनी आयोजीत केलेल्या अधिकृत खेळाच्या राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग किंवा प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी आपली नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कॉम्प्लेक्स एरीया , गडचिरोली येथे करावी. खेळाडू हा बेसबॉल, कॅरम, बुध्दीबळ, डॉजबॉल, रायफल शुटींग, वेटलिफ्टींग, फुटबॉल, नेटबॉल, जिम्नॅस्टीक, हॅन्डबॉल, लॉन टेनिस, मल्लखांब, शुटींगबॉल, रग्बी, सायकलींग, हॉकी, किकबॉक्सींग, तलवारबाजी, टेबल टेनिस, वूशू, सॉफ्टटेनिस, आर्चरी, बॉक्सींग, थ्रोबॉल, मॉडर्न पेंन्टॅथलॉन, टनिक्वाईट, ज्यूदो, बॉल बॅडमिंटन, खो-खो, जलतरण, बॅडमिंटन, बास्केटबॉल, रोलर स्केटींग, सिकई मार्शल आर्ट, सॉफ्टबॉल, स्क्वॅश, व्हॉलीबॉल, सेपक टकरा, आटया पाटया, योगासन, क्रीकेट, कबड्डी, कुस्ती,रोलबॉल, ॲथलेटिक्स, कराटे तायक्वांदो या मान्यताप्राप्त खेळामध्येच शालेय किंवा अधिकृत संघटनेव्दारा आयोजीत अधिकृत राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी किवा प्राविण्यप्राप्त असावा. जिल्हयातील अशा खेळाडूंनी आपल्या प्रमाणपत्राची छायांकीत प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कॉम्प्लेक्स एरीया , गडचिरोली येथे सादर करून नोंदणी करून घ्यावी असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी कळविले आहे.