जमीन वर्ग एक करण्यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर शिबीर घ्यावे

जमीन वर्ग एक करण्यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर शिबीर घ्यावे

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सूचना

युएलसीच्या जमिनी कुणाच्या नावावर करणार;खातेदारांचे वाद कसे सोडवणार

श्री. वडेट्टीवार यांचा सवाल

नागपूर,15:-युएलसीच्या जमिनीचे ज्यांना वाटप झाले आहे त्या जमिनी कुणाच्या नावावर करणार, या जमिनीत अनेक खातेदारांच्या नावावर आहेत त्यांचे वाद कसे सोडवणार, असे प्रश्न उपस्थित करत या जमिनी वर्ग एक करण्यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर शिबीर घ्यावे, अशी सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.

महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा) विधेयक, 2023 संदर्भातील चर्चेवेळी श्री. वडेट्टीवार बोलत होते.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, यूएलसीच्या जमिनी वर्ग एक करताना शेतकरी, खातेदार यांची पिळवणूक होते. सरकारी यंत्रणा ढिम्म असून काहीतरी अनधिकृत घेतल्याशिवाय जमीन वर्ग एक करत नाहीत. अशा प्रकारांना आळा घातला पाहिजे. त्यामुळे या जमिनी वर्ग एक करण्यासाठी तालुका, जिल्हास्तरावर शिबीर घ्यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. जमिनीच्या कमाल धारणेबाबत काय उपाय योजना केल्या, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.