राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, सदस्यांनी राजीनामा का दिला
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा विधानसभेत सवाल
नागपूर,12 :-राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, सदस्यांनी राजीनामा का दिला. त्यांच्यावर कोणता दबाव होता? असा प्रश्न विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला. यायबाबतची माहिती सभागृहाला कळली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
श्री. वडेट्टीवार म्हणाले, राज्य मागासवर्गीय आयोग हा ओबीसी रक्षणसाठी आहे. हा आयोग स्वायत्त आहे. चार तारखेला या आयोगाचे अध्यक्ष श्री. निरगुडे यांनी राजीनामा दिला. नऊ तारखेला राजीनामा स्वीकारला. स्वायत्त आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा देण्याआधी तीन सदस्यांनी राजीनामा दिला. या सदस्यांनी सांगितले आमच्यावर दबाव टाकला जातो. आमच्याकडून काम करून घेतले जात आहे. याबाबात सभागृहाला माहिती मिळाली पाहिजे.
या संदर्भात माहिती घेऊन सांगण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले.