पोलीस पाटील यांच्या हत्येप्रकरणी एका कट्टर जनमिलिशियास अटक
• महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण १.५ लाख रुपयांचे बक्षीस.
दिनांक ०२ ते ०८ डिसेंबर रोजी दरम्यान माओवादी हे पीएलजीए सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात.
दिनांक ०९/१२/२०२३ रोजी टिटोळा ता. एटापल्ली जि. गडचिरोली येथील पोलीस पाटील नामे लालसु वेळदा यांचे हत्येमधील आरोपी जहाल जनमिलिशिया नामे अर्जुन सम्मा हिचामी, वय १९ वर्षे, रा. झारेवाडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली हा पोस्टे पोस्टे गटटा (जां.) हददीत गटटा नाल्याजवळ पोस्टे गटटा (जां.) पोलीस पार्टीच्या हालचालींबाबतची माहीती देण्याच्या उद्देशाने फिरत असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान आणि पोस्टे गटटा (जां.) पोलीस पार्टीच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून त्यास अटक केली. अधिक तपासात असे दिसून आले की, २३ नोव्हेंबर २०२३ रोजी टिटोळा गावातील युवकांच्या रोजगारासाठी झटणा-या पोलीस पाटलाच्या तो पोलीसांचा खबरी असल्याच्या कारणावरुन माओवादयांकडुन करण्यात आलेल्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता हे उघड झाले आहे. सदर घटनेच्या काही दिवसापूर्वी त्याने आपली माहीती आणि ठावठिकाणा हा माओवादयांना सांगितला होता. तसेच पोस्टे गटटा (जां.), हेडरी, आणि सुरजागड भागातील सुरक्षा जवानांच्या हालचालींवर तो बारिक लक्ष ठेवुन होता. तसेच या वर्षाच्या फेब्रुवारीच्या उत्तरार्धात व मार्च महिन्याच्या सुरुवातीला विसामुंडी आणि अलेंगा येथील बांधकाम उपकरणांच्या जाळपोळ प्रकरणातही त्याचा सक्रीय सहभाग होता.
त्यास पोस्टे गटटा (जां.) ता, एटापली जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. ७६/२०२३ कलम ३०२,३६ड ४,१४३,१४७,१४८,१४९,१२०-ब भादवी, ३/२५ भारतीय हत्यार कायदा, १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहेत. तसेच टिटोळा ता. एटापल्ली जि. गडचिरोली येथील पोलीस पाटलाच्या हत्येमध्ये अटक करण्यात आलेला तो पहिला आरोपी आहे.
अटक जहाल जनमिलिशिया बाबत माहिती
नामे अर्जुन सम्मा हिचामी
> दलममधील कार्यकाळ
२०२१ पासुन तो झारेवाडा आणि आजुबाजुच्या भागात कार्यरत जनमिलीशिया म्हणुन सक्रीय होता येत्या काही दिवसात पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर सामील होण्याची त्याची योजना होती.
> कार्यकाळात केलेले गुन्हे
> जाळपोळ – ०२
माहे फेब्रुवारी २०२२ मध्ये विसामुंडी गावात झालेल्या जाळपोळीमध्ये त्याचा सहभाग होता
माहे मार्च २०२३ मध्ये झालेल्या अलेंगा-पुरसाळगोंडी गावात झालेल्या जाळपोळीमध्ये त्याचा सहभाग होता
• खून – ०१
माहे नोव्हेंबर २०२३ रोजी टिटोळा गावातील पोलीस पाटील लालसु टिंगरा वेळदा या निरपराध इसमाच्या हत्येमध्ये सहभाग.
> शासनाने जाहिर केलेले बक्षीस.
महाराष्ट्र शासनाने अर्जुन सम्मा हिचामी याच्या अटकेवर १.५ लाख रुपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७३ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. एम. रमेश सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच मा. पोलीस अधीक्षक यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.