रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला जिल्ह्यातून ६ हजाराच्यावर कार्यकर्ते जाणार
पत्रपरिषदेत जिल्हाध्यक्ष किरण अतकारी यांची माहिती
भंडारा :- आ. रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप दि. १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर येथे होणार आहे. या समारोपाला भंडारा जिल्ह्यातून ६५० च्यावर गाड्या जाणार असून त्यातून ६ हजारच्यावर कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष किरण अतकारी यांनी आज विश्रामगृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.
पत्रपरिषदेला भंडारा विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम, भंडारा शहराध्यक्ष मधूकर चौधरी, जिल्हा सचिव मधूकर भोपे, राकेश शामकुवर, बारामती येथून आलेले सुनील कोतकर, पवन पवार उपस्थित होते. किरण अतकरी पुढे म्हणाले, २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. या फुटीला भंडारा हे मुख्य केंद्र असल्याने आ. रोहित पवार यांचे संपूर्ण लक्ष भंडारा लोकसभा क्षेत्रावर केंद्रीत आहे. त्यांनी युवकांना संदेश देण्यासाठी पुणे येथून बुवा संघर्ष यात्रा सुरु, केली आहे. या यात्रेचा समारोप नागपूर येथे दि.१२ डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणार आहे. शरद पवार यांचे हात मजबूत करण्यासाठी व रोहित पवार यांना समर्थन देण्यासाठी यासाठी भंडारा जिल्ह्यात स्वमर्जीने येण्यासाठी ६३४ गाड्या तयार झाल्या असून यात अजून ५० गाड्यांची भर पडणार आहे. यातून ५ ते ६ हजार कार्यकर्ते नागपूरला जाणार आहे. रॅलीसमोर डिजे व ड्रोन कॅमेरा राहणार आहे. समारोपीय यात्रेला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकाअर्जुन खरगे, दिग्वीजय सिंह येणार असल्याचे ते म्हणाले.
इकबाल र्मिचीसोबत खा. प्रफुल पटेल हे पार्टनर असल्याने नवाब मलिकपेक्षा प्रमुख पटेल यांचा गुन्हा मोठा असल्याचेही अतकरी म्हणाले. येणारी लोकसभा आघाडी मिळून लढणार असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जो उमेदवार देतील तोच आमचा उमेदवार राहणार असल्याचे ते म्हणाले