राज्यपाल रमेश बैस यांचा भंडारा जिल्हा दौरा
भंडारा,दि. 07 : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे उद्या शुक्रवार दि.8 डिसेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
8 डिसेंबर रोजी सकाळी 9.40 वाजता राजभवन, नागपूर येथून भंडाऱ्याकडे प्रयाण करतील. त्यांनतर 10.55 वाजता शहापूर येथील डिफेन्स सर्व्हीसेस ॲकेडमी येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11 ते 12.30 दरम्यान विकसीत भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी 12.30 वाजता कार्यक्रमस्थळावरून 12.50 वाजता पिंगलेश्वरी देवी मंदीर, कोरंभी येथे आगमन. दर्शन व आरती कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी 13.10 ते 13.40 दरम्यान कोरंभी येथे राखीव वेळ. त्यानंतर दुपारी 2.05 वाजता चिखली येथील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तेथुन दुपारी 2.30 वाजता चिखली येथुन राजभवन नागपूरकडे रवाना होतील.