जिल्हा रुग्णालय इच्छुक उमेदवारांना निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण
- युवक –युवतींनी लाभ घ्यावा
भंडारा,दि. 06 : पारंपरिक शिक्षणाशिवाय प्रशिक्षण घेऊन रोजगार, स्वयंरोजगार मिळविणेही काळाजी गरज झाली आहे. याचआधारे केंद्र तसेच राज्यशासन कौशल्य विकास योजना राबविण्यात येत आहेत. याच धर्तीवर भंडारा जिल्ह्यातही सन 2023-24 मध्ये जिल्हा रुग्णालय भंडारातर्फे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) च्या माध्यमातून किमान कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील 15 ते 45 वयोगटातील रोजगार, स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय नैसर्गिक संसाधने तथा साधन सामुग्री इत्यादींच्या आधारे जिल्ह्यातील स्वयंरोजगारासाठी अधिक प्रशिक्षणाचे विशिष्ट कोर्सेस राबविणे तसेच मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करुन या क्षेत्रांच्या कौशल्याच्या मागणीनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण प्राप्त उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणे या उद्दिष्टांकरिता किमान कौशल्य उपलब्ध आहेत. विकास कार्यक्रम आणि प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियानांतर्गत निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु होणार आहे.
निःशुल्क प्रशिक्षण घेण्याकरिता पहिल्या टप्प्यात फ्लेबोटॉमिस्ट ३० – जागा (कालावधी – ३ महिने), जनरल ड्यूटि असिस्टंट 30 – जागा (कालावधी – ३ महिने) चे प्रशिक्षण आयोजीत केलेले आहे. उमेदवारांची निवड हि मुलाखती च्या आधारे करण्यात येईल. तरी भंडारा जिल्हयातील 15 ते 4५ वयोगटातील इच्छुक युवक-युवतींनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे प्रत्यक्ष भेट देवून प्रवेश अर्जाचा नमूना भरुन द्यावा. सोबत आधारकार्ड व शैक्षणीक कागदपत्राच्या छायांकित प्रती एक पासपोर्ट फोटोसहित अर्जासोबत जोडून सादर करावे. अधिक माहिती साठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे प्रत्यक्ष संपर्क करावा असे आवाहन डॉ दिपचंद सोयाम, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय, भंडारा यांनी केले आहे.