जवाहर नवोदय विद्यालय पाचगाव येथे माजी विद्यार्थी मेळावा
भंडारा,दि. 04 : विद्यार्थी कितीही मोठ्या पदावर गेले …तरी आपली शाळा मनात घर करून रहाते.. असाच प्रत्यय आज जवाहर नवोदय विद्यालय पाचगाव येथे माजी विद्यार्थी मेळाव्यात आला.
जवाहर नवोदय विद्यालय पाचगाव भंडारा येथे माजी विद्यार्थ्यांचे पहिले alumani meet आयोजित करण्यात आले होते. यात जवाहर नवोदय विद्यालय पाचगाव चया पहिल्या माजी विद्यार्थी मेळाव्यास भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील नवोदय विद्यालयामधून पास झालेल्या विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. या निमंत्रणात भरघोस प्रतिसाद देत अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपली हजेरी लावली. त्यांचे जवाहर नवोदय विद्यालयाच्या स्वागत करण्यात आले. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक नृत्य, नाट्य व गाणी सादर केली.
माजी विद्यार्थ्यांनी आपले नवोदय मधील अनुभव विद्यार्थ्यांपुढे मांडले. विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवावी. शिस्त का व कशी पाळावी. नवोदयन म्हणून आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत या आणि अशा अनेक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन डॉ चंद्रशेखर बांडे, स्वप्नील उराडे, जगदीश मते, सुनील गिर्हेपुंजे, रोशन टेम्भुरणे, संदीप धुर्वे, अविनाश पुसतोडे, प्राची बालपांडे या माजी विद्यार्थ्यांनी करून एक चांगले नागरिक व चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रोत्साहित केले.
माजी विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय येथे शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांचा स्मृतिचिन्ह आणि पुष्प देऊन सत्कार केला आणि नवोदय विद्यालयाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य बलवीर सर, गायकवाड सर, येरने सर यांनी सुद्धा आजी-माजी विद्यार्थ्यांसमोर मनोगत व्यक्त केले. प्राचार्य बलवीर यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार ज्योती निंबार्ते यांनी मानले. सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन रितेश बडवाईक आणि अपर्णा बडवाईक यांनी केले. आभार पुष्पा असीत मेश्राम यांनी मानले.