जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन साजरा

जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली
यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन साजरा

गडचिरोली, दि.02: जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या वतीने दि. १/१२/२०२३ जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथुन सकाळी ८.३० वाजता डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी प्रभात फेरीला हिरवी झेंडी दाखवुन सुरुवात करण्यात आली. या वेळी कार्यक्रमामध्ये डॉ. सतिशकुमार सोंळुके, डॉ माधुरी क्लिनाके, डॉ. नागदेवते, डॉ धुर्वे, डॉ. हेमके,अधिपरिचारीका हे उपस्थीत होते डॉ. नागदेवते यांनी एचआयव्ही/एड्स बदल माहिती देवून मार्गदर्शन केले. जागतिक एड्स दिनानिमित्त नर्सींग स्कुलचे विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले व व समारोप महेश भांडेकर जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी केले. या कार्यक्रमामध्ये नर्सींग स्कुल, आयटीआय कॉलेज, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.