राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिन्देवाही च्या वतीने विविध समस्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना…
सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी, सामान्य नागरीक, सुशिक्षीत बेरोजगार यांच्या विविध समस्याचे निवेदन सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने सिंदेवाही चे तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
प्रमुख समस्या व मागण्या
1) शेतकऱ्यांना सरसकट धानाला बोनस जाहीर करा
2) धानावर करपा, खोड किडा, पिसोर, घाटे अळी अशा विविध रोगांनी धान पीक उत्पादनात पट आली आहे याचे सर्वेक्षण करून मदत सरसकट देण्यात यावी.
3) सिंदेवाही तालुक्यातील धान कापणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर बऱ्याच शेतक-यांचे कापलेल धान बांधणी करून पुजणे करण्याअगोदरच पाऊस आल्याने नुकसानीचा सामना करण्याची वेळ बळीराजावर आलेली आहे करीता अवेळी झालेल्या पावसामुळे व रोगांमुळे धान, तुर इत्यादी पिकाच्या झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून शेतकरी बांधवांना धानाला सरसकट बोनस व मदत जाहीर करण्यात यावी.
4) सिंदेवाही तालुक्यात शासनाची जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ मंजूर करण्यात यावा.
5) धान पिकाला हमी भाव 3500/- रूपये प्रती क्विंटल देण्यात यावा.या मागण्या निवेदनातुन मांडण्यात आल्या.
यावेळी सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दामोधर नन्नावार, समीर पठाण,उमाजी नन्नावार,योगेश कुलसंगे,रमेश कावळे,अंबादास कोसे,जगदीश मेश्राम, चंद्रशेखर नागोसे, राजु वानखेडे,आरिफ शेख, परसराम गोरलावार,उमाजी नन्नावार, रमेश नागापूरे, वामन गायकवाड,राजू ताडाम, गुलाब शेरकुरे, बापूजा कोकोडे,दादाजी कामडी, अंबादास भरडे, मनोज नागपुरे,सुधीर लोनबले,सुनंदा लोणबले आदी उपस्थित होते