‘स्वाब’ संस्थेने केले मुक्ताई धबधबा, मांडवगोटा, व रॉक पेंटिंग परिसर स्वच्छ.
प्लास्टिक मुक्त पर्यावरण मोहीम अंतर्गत चिमूर वनपरिक्षेत्रातील तिन्ही पर्यटन स्थळ केले प्लास्टिक मुक्त.
ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या चिमूर वनपरिक्षेत्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ मुक्ताई धबधबा, ऐतिहासिक स्थळ दहा हजार वर्षांपूर्वीच्या रॉक पेंटिंग असलेली गुफा, व हिरापूर जवळील मांडवगोटा हे तिन्ही परिसर स्वाब नेचर केअर संस्थेच्या स्वच्छता मित्रांनी प्लास्टिक मुक्त पर्यावरण मोहीम राबवून संपूर्णपणे प्लास्टिक मुक्त केले.
पर्यावरण संरक्षण व संवर्धन करनारी ‘स्वाब’ संस्था गेल्या कित्येक वर्षापासून पर्यावरण व जंगलातील वन्य जीवाच्या सुरक्षेसाठी धोका असलेले ‘प्लास्टिक प्रदूषण नष्ट करण्याच्या’ उद्देशाने ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे त्या जंगल परिसरातील धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ, जंगलालगतचे रस्ते, व तलाव परिसर प्लास्टिक मुक्त करण्याकरिता ‘स्वाब’ संस्था ‘प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान’ राबवून प्रत्येक महिन्याला अशा जंगल परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन श्रमदानातून प्लास्टिक पत्रावळी, बाटल्या, दारूच्या बाटल्या, पिशव्या, प्लास्टिकच्या कचरा, गोळा करून त्याच्या योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून संपूर्ण परिसर प्लास्टिक मुक्त करीत असते. याच अनुषंगाने आज चिमूर वनपरिक्षेत्रातील तिन्ही पर्यटन स्थळ प्लास्टिक कचरा गोळा करून प्लास्टिक मुक्त केले. व येणाऱ्या पर्यटकांना प्लास्टिक कचऱ्याबद्दल जनजागृती करत तुम्ही जर आम्हाला सहकार्य करू शकत नसाल तर तुम्ही स्वतः जवळील आणलेला प्लास्टिक घरी परत घेऊन जाऊन कचराकुंडी टाका हीच तुमच्याकडून आम्हाला मोलाची मदत ठरेल असेही सांगितले.
यावेळी या प्लास्टिक मुक्त कार्यात संस्थेचे तळोधी, सावरगाव, खडकी, घोडाझरी, वाढोणा, किटाळी येथील स्वच्छता मित्र जीवेस सयाम, यश कायरकर, नितीन भेंडाळे, छत्रपती रामटेके, गिरीधर निकूरे, विनोद लेनगूरे, कैलास बोरकर, प्रशांत सहारे, वेदप्रकाश मेश्राम, शुभम निकेशर, कृणाल रामटेके, अमन करकाडे, पुंडलिक नागोसे, शुभम सुरपम,
कुणाल जेंगठे, हर्षवर्धन रंधये ,गणेश गुरनुले, यांनी श्रमदानातून ही स्वच्छता मोहीम राबवली तर यावेळी वन विभागाचे वनरक्षक बुरले व सोनूने, गायकवाड, वनरक्षक व क्षेत्र सहाय्यक पोरटे हे उपस्थित होते सोबतच काही वन मजूर इत्यादी उपस्थित होते.