इच्छुक आदिवासी पात्र लाभार्थ्यांनी आपल्या पंचायत समिती मार्फत अर्ज सादर करावी
भंडारा,दि.01 : प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अंतर्गत शबरी आदिवासी घरकुल योजना ग्रामीण क्षेत्र सन 2023-24 करिता 1226 इतका लक्षांक प्राप्त आहे.सदर योजने करीता इच्छुक आदिवासी पात्र लाभार्थ्यांनी परीपुर्ण भरलेले अर्ज आपल्या पंचायत समिती मार्फत सादर करावे,
तसेच अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे जोडण्यात यावी,
- अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो,
- लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा,
- रहिवासी दाखला,
4.7/12,सातबारा उतारा किंवा नमुना-8-अ तसेच घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी
- उत्पन्नाचा दाखला तहसिलदार यांचा
- एक रद्द केलेला धनादेश/राष्ट्रीयकृत बॅकेचे पासबुक प्रथम पानाची सत्यप्रत,
- ग्रामसभेचा ठराव
- शिधा पत्रिका
- आधार कार्ड
- सदर योजनेचा लाभ यापुर्वी आदिवासी विकास विभाग,अथवा इतर कोणत्याही शासकीय विभागाकडून घेतला
नसल्याबाबत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- सयुक्त कुटुंब असल्यास कुटुंबीयातील सदस्यांना यापुर्वी घरकुल लाभ न मिळाल्याचा प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रासह परीपुर्ण भरलेले अर्ज संबंधित पंचायत समितीस दिनांक 6 डिसेबर,2023 रोजी पर्यत तात्काळ सादर करावे,व योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे निरज एस.मारे यांनी कळविले आहे.