जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 2023 निमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती कार्यक्रम
गडचिरोली, दि.30: 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन म्हणुन सर्वत्र पाळण्यात येतो. आरोग्य विभागामार्फत जागतिक एड्स दिन निमित्त विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावर्षी जागतिक एड्स दिनाची थीम “Let Communities Leads समाजाच्या पुढाकार एचआयव्ही/एड्स समुह नाश” हा घोषवाक्य असुन या अंतर्गत 1 डिसेंबर व पंधरवाडयात अति जोखीमचे गट/भाग/जागा/ठिकाण/स्थलांतरीत कामगारांच्या कामाच्या ठिकाणी मुख्य चौक, बाजार गर्दीचे ठिकाणी व्यापक जनजागृती करुन जिल्हा व तालुका स्तरावर मोहिम अधिक प्रभावी करुन जास्तीत जास्त लोकापर्यत पोहोचुन त्यांना एचआयव्ही तपासणी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हा मुख्यालयासह तालुकास्तरावर जनजागृती प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. एचआयव्ही संसर्गित मुलासाठी चित्रकला व निबंध लेखन स्पर्धा उत्कृष्ठ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव प्रश्नमजुंषा स्पर्धा, महाविद्यालय स्तरावर रेड रिबिन क्लबच्या माध्यमातून विविध जनजागृती स्पर्धा, पथनाटय विविध महाविद्यालय व शासकीय कार्यालयात व्याख्याचे आयोजन करण्यात येणार असुन याद्वारे एचआयव्ही एड्स विषयी मुलभुत माहिती संसर्ग होण्याचे कारणे लक्षणे गैरसमज प्रतिबंधात्मक उपाय, त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा, ग्रामिण, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र एंकदरीत आरोग्य विभागाअंतर्गत विविध स्तरावर देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती प्रसार करण्याचा हेतु आहे. जेणेकरुन प्रत्येक नागरिकास या राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातंर्गत असलेल्या सेवाचा लाभ घेता येईल.
दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.30 वा. आयोजित प्रभात फेरी जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथून गांधी चौक , जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली या ठिकाणी समारोप होणार आहे. सदर प्रभात फेरीत स्थानिक सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी आवाहन केले आहे.