भंडारा जिल्हयात अवकाळी पाऊसामुळे भंडारा जिल्हयात मोठया प्रमाणात शेतकर्यांचा धान पिक तसेच भाजीपाला यांचा नुकसान झाला असून नुकसानग्रस्त शेतकर्यांचा नुकसानीचा पंचनामा करुन करुन शेतकर्यांना नुकसानीचा मोबदला देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना मागणीचा पत्र देण्यात येत आहे.
जिल्हयात अवकाळी पाऊसा सोबतच अनेक समस्या असुन खालील समस्या तत्काळ सोळवीण्यात यावा .
१) भंडारा जिल्हा ओला धुष्काल घोषित करा.
२)भंडारा जिल्ह्यातील शेतकर्यांना ३००००रु.प्रती हेक्टरी आर्थिक मदत जाहीर करा.
3)धान खरेदी केंद्राच्या जाचक अटी कमी करून धान खरेदी लवकर सुरू करा.
4)दुधाला शासनाने ठरऊन दिलेल्या रेट ने खाजगी व्यापार्यांनी रेट द्यावे.
5)भंडारा जिल्हा पीक विम्याच्या कक्षेत यावे.
6) रान डूकराला मारण्याची परवानगी देण्यात यावी.
7) वांणराला पकडण्याची शासनाने पथक मोहीम राबवावी.
8)भाजीपाला उत्पादक शेतकर्यांसाठी पावसामुळे नुकसान झाले त्यांना सरसकट मदत जाहीर करा.
9)नियमित कर्ज भरनार्या शेतकर्यांना आर्थिक मदत जाहीर करा.
10)दोन्ही कर्ज माफीच्या कक्षेतून सुटलेल्या शेतकर्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा .
11)वन्य प्राण्यांच्या शेतीला बचाव करण्या साठी तारेचा सिमेंट किव्वा लोखंडाच्या पोल करिता Dpc मधून टक्के % सुटीवर मदत जाहीर करा.
12)शेतीला दिवसा १२ तास वीज पुरवठा करा.
13)तुमसर येथील बहुचर्चित फेरो अलोयाईज कारखान्याची विद्युत पुरवठा माफ करून कंपनी तात्काळ शुरू करा..
13)तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी तालुका स्तरावरील श्घ्Dण् त उद्योग धंदे सुरू करा.
14) midc ची जागा इझ्ध् कंपनीला उद्योग धंदे करिता मुकरर करा.
15)भंडारा जिल्ह्यातील आदिवासी व इतर समाजाचे भागातील रखडलेले वन जमिनीचे पट्टे त्वरित देण्यात यावे.
16)परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा फी अगदी कमी आकारन्यात यावी.
17)mregs पांदन रस्त्याची मुरुमाची लिज प्रक्रिया कमी करण्यात यावी.
18)शिक्षकांचे ब्रेन मॅपिंग झाले पाहिजे जेणे करून गरिबांच्या मुलांना फुकट शिक्षण घेता यावे.
वरील मागण्या न झाल्यास राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या वतीने रस्तारोको तसेच जेलभरो आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी ही शासनावर राहील
निशांत सुखदेवे,सुखराम अतकरी,यशवंत भोयर,भूषण लांडगे,शायना खान,योगिता सूर्यवंशी,ईश्वर कळंबे,शहजादा भाऊ,दीपक वाघाये,आहुजा डोंगरे,बबलू बोपचे,ईश्वर तांडेकर,ज्ञानेश्वर पडोळे,मंगेश मेश्राम,निखिलेश खांडेकर,विजय नवखरे,महेश नखाते,एकनाथ फेंडर,नरेश ईश्वरकर,माधुरी चौधरी,सचिन मेश्राम,दिवाकर चौधरी,सुनिता डोंगरे
तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते