“महा आवास अभियान 2021-22” पुरस्कार वितरीत
जिल्हयास 12 पुरस्कार प्राप्त
भंडारा, दि.29: केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2021 ते 05 जून 2022 या कालावधीत “महा आवास अभियान 2021-22” राबविण्यात आले आहे. या कालावधीमध्ये राबवण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना महा आवास अभियान पुरस्कार देऊन गौरवण्याचा शासनाने निर्णय घेतला.
त्याअनुषंगाने 23 नोव्हेंबर 2023 रोजी यशवंतराव चव्हाण सेटंर, नरिमन पॉईट मुंबई येथे ग्रामविकास व पंचायतराज विभाग मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय “महा आवास अभियान 2021-22” पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये भंडारा जिल्हयास 12 पुरस्कार प्राप्त झाले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट जिल्हा मध्ये भंडारा जिल्हयास प्रथम पुरस्कार प्राप्त झाला, राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट तालुक्यामध्ये साकोली तालुक्यास द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला व राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारती अंतर्गत ग्रामपंचायत ताडगाव, ता. मोहाडी येथील बहुमजली इमारती ला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.
राज्यपुरस्कृत आवास योजना अंतर्गत राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट जिल्हामध्ये भंडारा जिल्हयास द्वितीय क्रमांक प्राप्त झाले, राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट तालुके मध्ये लाखनी तालुक्यास प्रथम पुरस्कार प्राप्त झाले. तसेच महा आवास अभियान उपक्रम प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अतर्गत मंजुर घरकुले 100 टक्के भौतिकदृष्टया पुर्ण करणे, गृहसंकुले (Housing Colony) उभारणे, लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी लॅण्ड बँक तयार करणे, किमान 10 टक्के घरकुल बांधकामासाठी वाळुला पर्याय क्रश सँड, सिमेंट ब्लॉक, इत्यादीचा वापर करुन तयार केलेली घरकुले, किमान 10 टक्के घरकुल बांधकामामध्ये फरशी/लादी, रंग रंगोटी, किचन गार्डन/परसबाग, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी वापर करुन तयार केलेली घरकुला अंतर्गत पुरस्कार प्राप्त झाले आहे.
तसेच “महा आवास अभियान 2021-22” विशेष पुरस्कार अधिकारी/कर्मचारी म्हणुन राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार जिल्हा प्रोग्रामर आशिष रामकृष्ण चकोले यांना देण्यात आले. राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार जिल्हा डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रफुल भास्कर मडामे यांना देण्यात आलेला आहे व राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार पंचायत समिती साकोली डाटा एन्ट्री ऑपरेटर हर्षल लेकराम मेंढे, यांना देण्यात आलेला आहे.