दिव्यांग व वृद्धांना साहित्य पुरविण्याबाबत 30 नोव्हेंबर रोजी जिवती येथे शिबीर
चंद्रपूर, दि.29 : भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम (एलिंम्को) ए.डी.आय.पी. योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे दिव्यांगांचे साहित्य पुरविणे (मोजमाप करण्याकरीता) व वयोश्री योजनेंतर्गत 60 वर्षातील वयोवृद्ध व्यक्तींना लागणारे साहित्य पुरविण्याबाबत 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता ग्रामीण रुग्णालय, जिवती येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या शिबिराला उपस्थित राहावे, असे आवाहन जि.प. जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी केले आहे.