प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पुर्व सूचना नोंदवाव्या

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पुर्व सूचना नोंदवाव्या

भंडारा, दि.28: प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना काढणी पश्चात अवस्थेत धानाचे पिक कापणी करून सुकवणी साठी शेतात पसरवून ठेवले असता गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी/ अवकाळी पाऊसामुळे नुकसान झाले असल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान मिळण्याची तरतूद आहे.

 सद्यस्थितीत बिगरमोसमी/ अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे धान पिकाचे काढणी पश्चात नुकसान होण्याची शक्यता नाकारत येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीस नुकसानीची पुर्वसूचना (Intimation) देणे आवश्यक आहे. त्याकरीता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी चोलामंडलम जनरल इंन्शुरंस कं. लि. या विमा कंपनीच्या टोल फ्रि कंमांक 18002089200 वर पुर्वसूचना देण्यात यावी.   किंवा केंद्र सरकारच्या क्रॉप इंन्सुरंस ॲप लिंक  https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central वर क्लिक करून ॲप डॉऊनलोड करून नुकसानीची माहिती नोंदवून पुर्वसूचना दयावी.

विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंस ॲप (Crop Insurance App) / संबंधित विमा कंपनीचे टोल फ्रि क्रमांक /बँक /कृषि व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवितांना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशिल कळविणे बंधनकारक असेल.

विमा कंपनीचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी

अ.क्र.तालुकाजिल्हा/ तालुका प्रतिनिधीचे नांवमोबाईल क्रमांक
1भंडारा जिल्हा प्रतिनीधीश्री विठ्ठल खुळे9766861081
2भंडाराश्री निखील लोणारे9764790288
3मोहाडीश्री कार्तीक कुमार फन्ने9766708622
4तुमसरश्री धीरज भोसकर8329721490
5पवनीश्री अतुल फुले9404318956
6साकोलीश्री रोहित कापगते7499739534
7लाखनीश्री प्रवीण बावणे7350532967
8लाखांदूरश्री आकाश चेटुले7030647636