सांस्कृतिक कार्यक्रम हे आपली लोकसंस्कृती जपण्याचे उत्तम मध्यम – डॉ. एन. डी. किरसान
कुरखेडा तालुक्यातील चिखली (नान्ही) येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा युवा मित्रांगण मंडळ व राणी दुर्गावती महिला मंडळ चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने “रायपूर ले आये सुवना” या छत्तीसगढी लोकनृत्याच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान मंचावर उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रम घेणे हे आपली संकृती आहे आणि त्याची जोपासना करण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. प्रत्येक संकृतीमध्ये त्यांचे लोकगीते, नृत्य प्रकार आणि बोली भाषेचा समावेश असतो. अश्या कार्यक्रमातूनच ते लोकांपुढे मांडता येते जेणेकरून पुढील पिढीला त्याबाबत माहिती आणि शिक्षण देता येते. आपण सामाजिक जीवनात पुढील पिढीला काय सादर करतो याचा भान ठेवूनच कार्याक्रामाची निवड केली पाहिजे असेही यावेळी डॉ. किरसान यांनी नागरिकांना संबोधित केले. शेतकऱ्यांचे शेतीचे कामे संपले कि असे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमाने शेतकरी वर्ग मनोरंजनाच्या दृष्टीने असे कार्यक्रम आयोजित करतात आणि आनंद घेतात. त्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे कार्यक्रम घेतलेले योग्य ठरते असेही यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक माजी पोलीस अधीक्षक निताराम कुमरे, सह उद्घाटक दयाराम मच्छिरके, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष जीवन पाटील नाट, माजी जि प उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेट्टी, माजी प. स. सभापती गिरीधर तितराम, माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले, माझी सिनेट सदस्य चांगदेव फाये, रामदास मसराम, जावेद भाई, माजी तालुकाध्यक्ष जयंत हरडे, वासुदेव बहेटवार, रामसाय मडावी, नाना जनबंधू, लोकेश नेताम, सरपंच सविता कुमरे, फिरोजा शेख, पुरुषोत्तम तिरंगम, पोर्णिमा ताई सोनटक्के, मोहन मडावी, रूपचंद कापगते, प्रेमलाल मच्छिरके, गणपत बनसोड, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.