“ग्रामीण पत्रकार संघाचा” 25 वा रौप्य महोत्सव मुंबईत

“ग्रामीण पत्रकार संघाचा” 25 वा रौप्य महोत्सव मुंबईत

पत्रकार व उद्योजकांना पुरस्कार

मुंबई वृत्तसंस्था
महाराष्ट्रात ग्रामीण पत्रकारांचा आधारस्तंभ म्हणून कार्य करित असलेल्या ग्रामीण पत्रकार संघ आपला 25 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचे मुंबई येथे आयोजन करत आहे.या कार्यक्रमात पत्रकारांनी विविध माध्यम प्लॅटफॉर्मवर केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पत्रकारांना *जर्नालिस्ट एक्सलंन्ट* व उद्योजकांना *महाराष्ट्र राईंजिंग स्टार* पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे.
हा कार्यक्रम पनवेल येथील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके सभागृहात डिसेंबर महिन्यात २३तारखेला सकाळी ११वाजता होणार आहे.
महाराष्ट्रात विविध माध्यमात काम करणाऱ्या होतकरू, निर्भिड आणि धडाडीच्या प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडियातील पत्रकारांचा सन्मान करून, पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींनी केलेल्या वैविध्यपूर्ण आणि प्रभावी योगदानाची कबुली देतो. विविध पॅरामीटर्सवर आधारित 50 पत्रकारांना शॉर्टलिस्ट करण्याच्या सूक्ष्म प्रक्रियेद्वारे सर्वात योग्य पत्रकारांना ग्रामीण पत्रकार संघातर्फे *जर्नालिस्ट एक्सलंन्ट* पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
यासोबतच उद्योजक कॅटेगरी मध्ये महाराष्ट्रातील उद्योजक ,एनजीओ, स्टार्टअप , ज्वेलर्स,आरोग्यसेवा, वैयक्तिक, रिअल इस्टेट, शिक्षण, कृषी या बिझनेस कॅटेगरी मध्ये व्यवसाय उत्कृष्टता असलेली व्यक्ती सहभागी होऊ शकतात. या क्षेत्रातील उत्कृष्ट काम करुन आदर्श निर्माण करणाऱ्यांना *महाराष्ट्र राईंजिंग स्टार* या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर बळवंत फडके सभागृहात 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पत्रकारांना या पुरस्कारासाठी नोंदणी करता येणे सहज शक्य असून नोंदणी करिता ग्रामीण पत्रकार संघाच्या फेसबुक पेज अथवा इन्स्टाग्राम पेज अथवा ग्रामीण पत्रकार संघाचे राजेश डांगटे,(9822691851)अविनाश राठोड (9765730225) गोपाल नारे(7822022327) स्वप्नील दुधारे मुंबई( 9322991919) अमोल राणे मुंबई (9664607262) अनंत गावंडे (7972516438) यांचेशी संपर्क साधावा.
हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते व प्रसिद्ध गायिका दिपाली देसाई, दूरदर्शन केंद्राचे माजी संचालक मुकेश शर्मा, दैनिक देशोन्नती चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे , ग्रामीण पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष गजानन वाघमारे विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार अनिल महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अनेक वरिष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार आहे. अशी माहिती राज्य प्रवक्ता अनंत गावंडे यांनी दिली आहे.या संधीचा लाभ पत्रकारांनी घ्यावा असे आवाहन ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकाऱ्यांनी केले आहे.