दहा वाळु डेपोकरीता 79 निविदा प्राप्त
भंडारा दि.23 जिल्हाधिकारी यांचे प्रयत्नामुळे शासनाचे सुधारीत वाळु धोरणानुसार जिल्हाधिकारी कार्यालय,भंडारा खनिकर्म विभागाकडुन प्रसिद्ध करण्यात आलेल्या 10 वाळु डेपो करीता 79 निविदा प्राप्त झाल्या आहेत.
सुधारीत वाळु धोरणानुसार नागरीकांना स्वस्त दरात वाळु उपलब्ध करुन देणे हा शासनाचा मुळ उद्देश आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील 10 वाळु डेपोमधील 26 घाटातुन नागरीकांना स्वस्त दरात वाळु उपलब्ध करुन देण्याकरीता दिनांक 6.11.2023 रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.
मौजा परसोडी ता.साकोली येथील डेपोकरीता एकुण 8 निविदा, मौजा अंतरगाव ता.लाखांदुर येथील डेपोकरीता एकुण 7 निविदा, मौजा चारगाव ता.तुमसर येथील डेपोकरीता एकुण 26 निविदा, मौजा खंडाळा ता.साकोली येथील डेपोकरीता एकुण 5 निविदा, मौजा खोलमारा ता.लाखांदुर येथील डेपोकरीता एकुण 5 निविदा, मौजा कोथुर्णा ता.भंडारा येथील डेपोकरीता एकुण 8 निविदा, मौजा मोहगाव (देवी) ता.मोहाडी येथील डेपोकरीता एकुण 5 निविदा, मौजा नरव्हा ता.लाखनी येथील डेपोकरीता एकुण 6 निविदा, मौजा पळसगाव ता.लाखनी येथील डेपोकरीता एकुण 8 निविदा प्राप्त झालेल्या आहेत. अशा एकुण 79 निविदा प्राप्त झालेल्या आहेत.
मौजा पाचगाव ता .मोहाडी येथील डेपोकरीता एक निविदा प्राप्त झाल्यामुळे या डेपोला प्रथम मुदतवाढ देण्यात आली असुन या करीता निविदाधारकांना 21.11.2023 ते 28.11.2023 सायं.17.00 वा. पर्यंत निविदेचा भरणा करता येईल. असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी कळवले आहे.