मतदार यादी निरीक्षक तथा नागपूरच्या विभागीय आयुक्त
28 नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत
गडचिरोली, दि.23: भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीत मतदार यादी निरीक्षकांच्या जिल्हानिहाय तीन भेटींचे आयोजन असून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे दावे व हरकती सादर करण्याच्या कालावधीत पहिली भेट, 28 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 4.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे असून जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार आणि सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधींची बैठक आयेाजित करण्यात आली आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रसेनजीत प्रधान यांनी कळविले आहे.