सन 2024 वर्षातील शासकीय स्थानिक सुटया जाहीर
भंडारा दि.22: महाराष्ट्र शासन राजकीय सेवा विभागाच्या 16 जानेवारी 1958 च्या शासन निर्णय क्र.पी. 13- बी तसेच दिनांक 6 ऑगस्ट, 1958 च्या समक्रमांकाच्या शासन निर्णयानुसार , जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सन 2024 या वर्षाकरिता भंडारा जिल्ह्याला तीन स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहे.
त्यामध्ये अक्षय तृतीया 10 मे, 2024 शुक्रवार, पोळा दुसरा दिवस 3 सप्टेंबर, 2024 मंगळवार नरक चतुर्दशी 31 ऑक्टोबर,2024 गुरुवार, या तीन दिवशी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. वरिल आदेश भंडारा जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकोष बॅक यांना लागु होणार नाही.असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.