जागतिक मत्स्य दिन साजरा
भंडारा,दि.21 :- सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय मध्ये जागतीक मत्स्य दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी शशीकुमार बोरकर, मुख्यमंत्री फेलो निलेश साळुंखे, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय उमाकांत सबनीस, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष सदाशीवराव वलथरे, जिल्हा मच्छीमार संघ संचालक अजय मोहनकर, गजानन बादशहा, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी महेश हजारे, रोहित चौकडे उपस्थित होते.
या कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय करणा-या समाज बांधवांना जागतिक मस्त्य दिवसाचे महत्व सांगण्यात आले.या प्रसंगी मच्छीमार किसान क्रेडीट कार्ड व मच्छीमार विमा योजने बद्दल प्रमुख पाहूण्यांनी सखोल मार्गदर्शन केले. व सर्व मत्स्यपालन सहकारी संस्थांच्या सदस्यांनी मच्छीमार किसान क्रेडीट कार्ड तयार करण्याचे आव्हान कार्यक्रमात करण्यात आले.
या प्रसंगी मासेमार संकट निवारण निधी अंतर्गत मृत मच्छीमारांच्या वारसांना अर्थसहाय्य म्हणून मच्छीमार विमा योजनेचे धनादेश श्रीमती मोताई तिमा वलथरे व श्रीमती शांता जयदेव मेश्राम यांना एक – एक लक्ष रूपयाचे धनादेश पाहुण्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्रीमती मोनाली निबांर्ते यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल शिवरकर, गोपी मेश्राम, ईसराम दिघोरे, देवेंद्र मोहनकर, बीसन केवट, मधूकर वलथरे, तेजराम सतीमेश्राम, मदनलाल मेश्राम व कार्यालयातील सर्व कर्मचा-यांनी प्रयत्न केले.