शासन आपल्या दारी कार्यक्रमात लागणार 52 शासकीय विभागाचे  स्टॉल महारोजगार मेळाव्यात 16 कंपन्याचा सहभाग

शासन आपल्या दारी कार्यक्रमात लागणार 52 शासकीय विभागाचे  स्टॉल महारोजगार मेळाव्यात 16 कंपन्याचा सहभाग

 

          भंडारा दि.19   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत व सर्व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत उदया होणा-या शासन आपल्या दारी कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्याप्त आहे.

        उदया होणा-या शासन आपल्या दारी कार्यक्रमात 52 शासकीय विभागाचे स्टॉल लागणार आहेत.यामध्ये आरोग्य,कृषी,माविम,उमेद सोबत पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून एकूण 1682 रिक्तपदे भरण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून जिल्हायातील नोकरीइच्छुक सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

          या मेळाव्याविषयी माहिती देण्यासाठी आज जिल्हा प्रशासन व मुख्यमंत्री कार्यालयाचे राहूल देशपांडे,विकास औटी उपस्थित होते.कार्यक्रमासाठीची पार्कींग व्यवस्था या कार्यक्रमासाठी मोठया संख्येने नागरिक व लाभार्थी उपस्थित राहणार असुन  मिशन हायस्कुल लाभार्थी बसेस ,गणेशपूर,परेड ग्राउंड पेालीस मुख्यालय,भंडारा येथे लाभार्थीचे बसेससाठी,सेंट पॉल स्कुल,तुरस्कर मैदान येथे साकोली ,पवनीमार्गे येणारे खासगी वाहने,गणेश स्कुल येथे  तुमसर,मोहाडी,खातरोड मार्गे येणारी खासगी वाहने,प्रगती महिला विदयालयात जवाहर नगर मार्गे येणारे खासगी वाहने ,जिल्हा नियोजन भवन आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे शासकीय अधिकारी वाहने,तर पोलीस नियंत्रण कक्ष येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वाहने पार्कींग,बैल बाजार मैदान व जे.एम.पटेल कॉलेज हे दोन मैदाने राखीव ठेवण्यात येणार आहे.

        राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतुक मार्गात तात्पुरता बदल वाहतुकीचे नियमन व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी वाहतुक नियमनाच्या दृष्टीने जड अवजड वाहतूक पुढील प्रमाणे वळविण्यात येत आहे. त्यामध्ये नागपूर कडून साकोली भंडारा शहरातून जाणारी जड वाहतूक मौजा शहापूर बोगदा मार्गे  गोपेवाडा– सातोना- नेरी – वरठी ,

        तर साकोली कडून नागपूरकडे कडे भंडारा शहरातून जाणारी जड वाहतूक मौजा लाखनी मार्गे- केसलवाडा ,अड्याल- पवनी तर कारधा टी पॉइंट ते अड्याळ पवनी मार्गे नागपूरला वळवण्यात येत आहे.