पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना सन 2023-24
विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेणेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
गडचिरोली,दि.08:विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाच्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात अर्ज करुन देखील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना “पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना” अंतर्गत शिक्षण घेता यावे अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणे करिता शासनाने दि.06 सप्टेंबर 2019 च्या सुधारित शासन निर्णयान्वये “पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना” सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेणे करिता विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थी हा प्रॉपर जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या विविध स्तरातील महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहवासी नसावा. विद्यार्थी धनगर समाजातील असावा. विद्याथ्याने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकर राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी च्या परिक्षेमध्ये 60% गुण असणे अनिवार्य आहे.
या योजनेमध्ये दिव्यांग (विजाभज प्रवर्गातील धनगर समाज) प्रथम आरक्षण असेल. या योजनेचा लाभ घेणेसाठी विद्यार्थ्याने विजाभज, इमाव, विमाप्र, कल्याण विभागच्या महाडिबीटी पोर्टलवरील अर्ज मंजुर झालेला असावा. सदर योजनेचा लाभ घेणेकरिता विद्यार्थ्याचे वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा जास्त नसावे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2023-24 या शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांनी दि.16 फेब्रुवारी 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचेकडे अर्ज सादर करण्यात यावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण ,गडचिरोली यांनी केले आहे. योजनेचा लाभ घेणेसाठी विहीत अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली या कार्यालयात उपलब्ध आहे. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.