दिवाळीची खरेदी करा माविमच्या प्रदर्शनीतून…
प्रदर्शनीचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले उद्घाटन
भंडारा, दि. 7 : आकर्षक पणत्या ,दिवाळीचा चविष्ट फराळ, यासह दिवाळीला भेटवस्तू देण्यासाठी म्हणून कापडाच्या बॅग तसेच अनेक घरगुती साहित्यांची विक्री व प्रदर्शनीचे आयोजन केले आहे. भंडारा वासियांनी या प्रदर्शनीतून खरेदी करावी व महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, भंडाराद्वारे बचत गटातील महिलाद्वारे उत्पादित भव्य जिल्हास्तरीय तेजस्विनी प्रदर्शनीचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज केले.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संगीता माने,जिल्हा उद्योग विभागाचे अधिकारी हेमंत बदर जिल्हा समन्वयक अधिकारी,श्रीमती संगीता भोंगाडे, सहायक सहनियत्रंण अधिकारी प्रफुल अवघड,लेखा अधिकारी मुंकूद देशकर,तसेच इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा प्रदर्शनीमध्ये बचत गटातील महिलांद्वारे उत्पादित वस्तूमध्ये दिवाळीनिमित्त फराळाचे साहित्य, विविध प्रकारचे सुगंधित, विविध शोभिवंत कापडी व लेदर बँग्ज, सुगंधित अगरबत्ती, मातीचे दिवे, साड्या, बेडशीट, विविध खाद्यपदार्थ, विविध प्रकारचे आकर्षक शर्टस, भिवापुरी मिरची पावडर, मसाले, नुडल्स तथा अन्य वस्तूंचे स्टॉल्स उपलब्ध आहे.
प्रदर्शनीत मोठ्या संख्येने नागरिकांनी स्टॉलला भेट देऊन स्वयंसहाय्य बचत गटातील महिलांचा उत्साह द्विगुणीत करावा, असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी संगीता भोंगाडे यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक सहायक अधिकारी प्रफुल अवघड यांनी केले.
नऊ नोव्हेंबर पर्यंत ही प्रदर्शनी व विक्री नागरिकांसाठी खुली असून वरठी रोडवरील गुजराती समाज वाडी, जलाराम चौक येथे रात्री 9 पर्यंत ही प्रदर्शनी खुली राहील.