महाकृषी ऊर्जा अभियान योजना लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्ज, अर्जातील त्रुटी पूर्ण करण्याचे आवाहन
भंडारा दि.7 महाकृषी ऊर्जा अभियान पी.एम.कुसुम-ब योजनेंतर्गत भंडारा जिल्हयामध्ये शेतक-यांचे एकुण 1 हजार 927 परिपुर्ण अर्ज आजतागायत महाऊर्जाच्या ऑनलाइन कुसूम पोर्टलवर प्राप्त झालेले आहेत. या अर्जांपैकी 840 लाभार्थी शेतक-यांनी सौरपंप योजनेचा लाभ घेतलेला आहे.
तसेच एकूण 1 हजार 927 लाभार्थी शेतक-यांपैकी 617 लाभार्थी शेतक-यांच्या अर्जा मध्ये कागदपत्रांची त्रुटी आढळलेली आहे. त्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित यादी मध्ये आहेत. या सर्व लाभार्थ्यांना कुसूम पोर्टल वरुन एसएमएस त्यांच्या भ्रमणध्वनीवर पाठविण्यात आलेले आहेत.
तसेच महाऊर्जा जिल्हा कार्यालय, भंडारा यांच्याकडून अशा सर्व लाभार्थ्यांना कागदपत्रांची त्रुटी पूर्ण करण्यासाठी भ्रमणध्वनी द्वारे कळविण्यात आलेले आहे. मात्र अद्याप पर्यंत काही लाभार्थीं कडून त्रुटीची पूर्तता करण्यात आलेली नाही. भंडारा तालूका निहाय त्रुटीतील अर्जाची संख्या भंडारा-53, मोहाडी-108, तुमसर-45, लाखनी-327, साकोली-38, लाखांदुर-22, पवनी-24, असे एकूण 617 त्रुटी आहेत.
तसेच या व्यतिरिक्त 760 शेतकऱ्यांचे अर्ज अपुर्ण आहेत या अनुषंगाने संबंधित लाभार्थी शेतक-यांनी महाऊर्जा, जिल्हा कार्यालय, भंडारा येथे दूरध्वनी क्रमांक.88303447130, 7058500885 ई-मेल आयडी dobhandara@mahaurja.com वर संपर्क करुन आपल्या अर्जामध्ये असलेल्या कागदपत्रांच्या त्रुटीबाबत व अर्ज अपुर्ण असलेल्या शेतकऱ्यांना अर्ज पुर्ण करण्याकरीता काही अडचणी उद्भवत असल्यास महाऊर्जा जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा. तसेच प्राप्त मागदर्शना नुसार त्रुटी पूर्तता करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक नितीन पाटेकर यांनी केले आहे.