तीस फूट खोल विहिरीत पडलेल्या घोणस सापाला पकडून दिले जीवदान.
(येत्या पावसाळ्यात संस्थेने दिले शेकडो सापांना जीवदान.)
सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सिन्देवाही तालुक्यातील नवरगाव येथील ‘निवृत्ती कामडी’ यांच्या शेत शिवारातील जवळपास 30 फूट खोल विहिरीमध्ये तीन दिवसांपूर्वी पासून एक मोठ्या आकाराचा घोणस साप पडलेला असल्याची माहिती तेथील वनरक्षकाद्वारे ‘स्वाब’ संस्थेच्या सर्पमित्रांचा नंबर घेऊन संस्थेच्या सर्प रक्षकांना देण्यात आली. माहिती मिळताच त्या ठिकाणी जाऊन दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर त्या घोणस सापाला विहिरीतून बाहेर काढून परिसरातील जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून जीवदान देण्यात आले.
यावेळेस ‘स्वाब नेचर केअर संस्थेचे’ अध्यक्ष, सर्पमित्र’ यश कायरकर’ यांनी या सापाला नवरगाव चे वनरक्षक ‘नितेश सहारे’ यांच्या उपस्थितीमध्ये या सापाला पकडून त्या सापाची वन विभागामध्ये नोंद करून जंगलामध्ये सुरक्षित ठिकाणी सोडून जीवदान दिले.
विशेष म्हणजे स्वाब संस्थेचे सदस्य व सर्पमित्र जीवेश सयाम, विकास लोणबले, महेश बोरकर, यश कायरकर हे ब्रम्हपुरी वन विभागाच्या शिंदेवाही, तळोदी , नवरगाव, मेंडकी परिसरातील कुठल्याही अरगडीच्या ठिकाणी असलेल्या व संकटात सापडलेल्या सापांना त्याबद्दल माहिती मिळतात पकडून वन विभागात नोंद करून सुरक्षित ठिकाणी सोडन्याचे कार्य करतात. याच संदर्भात त्यांनी या पावसाळ्यात शिंदेवाही, नागभीड, नवरगाव , तळोधी, मेंडकी या परिसरामध्ये शेकडो सापांना जीवदान दिले. त्यामध्ये नाग , घोणस, मन्यार, यासारख्या विषारी तर अजगर, धामण , धूळ नागिन, तस्कर, वाळा, कुकरी, कवड्या अशा बिनविषारी तर मांजर्या सारख्या निम विषारी सापांना यावेळेस त्यांनी जीवदान दिले.