निवृत्तीवेतन व कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे
प्रमाणपत्र सादर करावे
कोषागार कार्यालयाची सूचना
भंडारा, दि. 30 : निवृत्तीवेतन व कुटूंबनिवृत्तीवेतन नियमित सुरु ठेवण्याकरीता बॅकेमार्फत हयातीचे दाखले दिनांक 1 नोव्हेंबर,2023 ते 30 नोव्हेंबर,2023 पर्यत सादर करावे,अथवा www.jeevanpraman.gov.in द्वारे डिजीटल लाईफ सर्टीफिकेटची सुविधा कोषागार व उपकोषागार तसेच Common Services Centres द्वारा दाखल करता येतील.
सदरचे प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम दिनांक 30 नोव्होबर,2023 आहे.अशाप्रकारचे प्रमाणपत्र सादर न केल्यास माहे डिसेंबर,2023 चे निवृत्तीवेतन प्रदान केल्या जाणार नाही.यांची निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी,असे आवाहन कोषागार अधिकारी भंडारा यांनी कळविले आहे.