सामुहिक  विवाह  सोहळ्यासाठी नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रस्ताव आमंत्रित

सामुहिक  विवाह  सोहळ्यासाठी नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रस्ताव आमंत्रित

 

        भंडारा, दि.26 :  जिल्हयामध्ये जनगणना 2011 नुसार आदिवासी जमातीची लोकसंख्या 88886 असून विविध जमातीचा समावेश आहे.या जमातीच्या लग्न समारंभ सोहळा कार्यक्रम निमित्ताने मोठया प्रमाणावर होणारा खर्च कमी करण्यासाठी आणि विवाह सोहळयातील अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी सामोहिक विवाह सोहळयांना प्रोत्साहन देणे करिता सामुहिक विवाह सोहळयात सहभागी होणाऱ्या वर आणि वधू यांना रु.10,000/- आर्थिक सहाय्य दिले जाते.

         तसेच सदर सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेस  रु.10,000/- किमान 10 जोडपे याप्रमाणे दिले जाते.सदर योजना भंडारा जिल्हयात राबविणे करिता नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रस्ताव मागविण्यात येत आहे.तरी इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी योजना राबविणे करिता दि.20 ऑक्टोबर,2023 पर्यत प्रस्ताव मागविण्यात आले होते.परंतु प्रस्ताव अप्राप्त असल्याने,पुनश्च 15 डिसेबर,2023 पर्यत स्वयंसेवी संस्थामार्फत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

         तसेच अधिक माहिती करिता प्रकल्प कार्यालय,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,भंडारा येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी कळविले आहे.