साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
विकास महामंडळाची थेट कर्ज योजना
Ø 2 नोव्हेंबरपर्यंत अनुसूचित जातीतील हिंदू-मांग, मातंग लाभार्थ्यांकडून अर्ज आंमत्रित
चंद्रपूर, दि. 26 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या चंद्रपूर जिल्हा कार्यालयामार्फत थेट कर्ज योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील हिंदू-मांग, मातंग व तत्सम 12 पोट जातीतील लाभार्थ्यांकरीता आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 30 चे भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
इच्छुक लाभार्थ्यांनी 2 नोव्हेंबर 2023 पर्यंत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात प्रत्यक्ष येऊन कर्जाचे अर्ज घ्यावे तसेच रीतसर अर्ज भरून सादर करावे. लाभार्थ्यांशिवाय इतर व्यक्तींकडून अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. तसेच कर्ज प्रकरण 1 लक्ष रुपयांच्या मर्यादेत मंजूर करता येईल. याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. व्ही. राचर्लावार यांनी कळविले आहे.