सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षक नामिका तयार करण्यासाठी लेखापरीक्षकांकडून अर्ज आमंत्रित

सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षक नामिका तयार करण्यासाठी लेखापरीक्षकांकडून अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 20 : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 अन्वये सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण निबंधकांनी तयार केलेल्या व राज्य शासनाने मान्यता दिलेल्या नामिकेवरील लेखापरीक्षकाकडून करवून घेण्याची तरतूद आहे. सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षकांच्या नामिकेसंदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चे नियम 69 (1)(फ) मधील तरतुदीनुसार सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी सन 2024 ते 26 या कालावधीसाठी लेखापरीक्षक नामिका तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

www.mahasahakar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दि. 23 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्जासंदर्भातील सविस्तर तपशील वेबसाईटवर उपलब्ध आहे.  सद्यस्थितीत सहकार खात्याच्या लेखापरीक्षक नामिकेवर असलेल्या लेखापरीक्षकांनी तसेच नामिकेवर नव्याने येऊ इच्छिणाऱ्या लेखापरीक्षकांनी निर्धारित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी कळविले आहे.