ठानेदाराचे निंलबन व अवैध धंद्दे बंद करण्यासाठी अजित सुकारे, यांचा आमरण उपोषणाचा इशारा…
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्राला पोलीस विभागाची केराची टोपली…
नागभिड तालुक्यातील तळोधी (बा.) पोलिस स्टेशन अतंर्गत अनेक गावांत दारु, वाळू, सट्टा, मटका, व सुगंधित तंबाखू यांची अवैध तस्करी मोठ्या प्रमाणांत सुरू आहे. मात्र तळोधी पोलिस स्टेशन यावर कोणतीही योग्य कारवाई करीत नसुन उलट अवैध व्यवसायांना पाठिसी घालत असुन अवैध व्यवसायीकाकडून पैसाची वसुली करीत आहे. या संदर्भातील तक्रार राज्यांचे गूहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतः भेटून निवेदन देऊन, यांचें सह जिल्यातील सर्वंच वरिष्ठ अधिकारी यांना देण्यात आले. मात्र अजूनही तळोधी पोलिस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या अवैध धंद्यांना आळा बसला नसुन या अवैध धंद्यांना कारणीभूत असलेल्या ठानेदारावरही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने चिमुर विधानसभा क्षेत्रातील सामाजीक कार्यकर्ते अजित सुकारे हे 27 ऑक्टोबर ला तळोधी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आमरण उपोषणाची परवानगी देण्या सर्दभात वरिष्ठ अधिकारी यांना नुकतेच निदेवन देण्यांत आलें असुन 8 दिवसांचा अल्टिमेट निवेदनातून देण्यांत आला आहे. येत्या 26 ऑक्टोबर पर्यंत वरिष्ठांकडून योग्य कारवाई न झाल्यास 27 ऑक्टोबर ला तळोधी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसण्याचा गंभीर इशारा अजित सुकारे, यांनी निवेदनातून केला.
Home Breaking News ठानेदाराचे निंलबन व अवैध धंद्दे बंद करण्यासाठी अजित सुकारे, यांचा आमरण उपोषणाचा...