वैदयकीय महाविदयालयाच्या कामाला गती दयावी– खासदार सुनिल मेंढे
भंडारा, दि. 16: जिल्हयात प्रस्तावित वैदयकीय महाविदयालयाचे बांधकाम तथा अन्य अनुषंगीक बाबीसाठी प्रशासनाने गती दयावी असे निर्देश खासदार सुनिल मेंढे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी शल्य चिकीत्सक डॉ.दीपचंद सोयाम,वैदयकीय महाविदयालयाचे डीन डॉ.अभय हातेकर यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आज खासदार श्री.मेंढे यांनी आज, धान खरेदी, आयुष्यमान भारत मोहीम तसेच पटटेवाटपाबाबत आढावा घेतला.
जिल्हयातील प्रलंबित पटटेवाटपाबाबत जलदगतीने कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली. तसेच धान खरेदी बाबत पणन विभागाने केलेल्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे, उपस्थित होते. जिल्हास्तरावर प्रलंबित विषयाचा पाठपुरावा शासनस्तरावर करण्यासाठी जिल्हाधिका-यांना त्यांनी निर्देश दिले.