पोलीसांच्या कम्युनिटी पोलीसिंग अंतर्गत राबविण्यात येणा-या MPSC व UPSC मार्गदर्शन…
पोलीस अधीक्षक भंडारा लोहीत मतानी हे भंडारा जिल्हातील कार्यभार स्वीकारल्यापासुन त्यानी अनेक नवे उपक्रम राबविले आहेत. भंडारा पोलीसांच्या कम्युनिटी पोलीसिंग अंतर्गत राबविण्यात येणा-या MPSC व UPSC मार्गदर्शन करणा-या प्रोजेक्ट कमर्शिला या उपक्रमाची पहिली तुकडी आज १० ऑक्टोबर २०२३ रोजी नानाजी जोशी महाविद्यालय सुरु झाली. भंडारा जिल्ह्यातील ६० निवडक विद्यार्थ्याना सहा ते आठ महिन्यांच्या कालावधीसाठी UPSC आणि MPSC हायब्रीड कोर्सचे सखोल प्रशिक्षण दिले जाईल. भंडारा येथील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी UPSC आणि MPSC व्दारे घेतलेल्या प्रतिष्ठित परीक्षांमध्ये निवड होऊन भविष्यात IAS आणि IPS परीक्षांमध्ये सहभागी व्हावे, हे लक्ष्य आहे. या प्रकल्पाचे लक्ष्य विशेषतः महिला विद्यार्थिनी सक्षम करण्यासाठी आहे. जे तयारी साठी इतर शहरांमध्ये स्थलांतरित होऊ शकत नाहीत. अश्यासाठी सवर्ण संधी आहे. त्यामध्ये २४ तास वाचनालयाची सुविधा उपलब्ध आहे. पुण्यातील शिक्षक येथे ऑफलाईन पध्दतीने शिकवणार आहेत. विद्यार्थ्याना आवश्यक ती सर्व पुस्तके आणि नोट्स पुरवल्या जातील. विद्यार्थ्याची प्रगती तपासण्यासाठी नियमितपणे चाचणी मालिका आयोजित केली जाईल.