अखेर कामगारांच्या मागण्या मान्य…
तिसऱ्या दिवशी कामगारांच्या आंदोलनात अजय मेश्राम व मॅनेजर यांच्या हस्ते उपोषणाची सांगता
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांच्या नेतृत्वातील उपोषणाला मोठे यश
भंडारा प्रतिनिधी
:भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालया पुढे गेल्या तीन दिवसा पासून सुरू असलेल्या हिंदुस्थान कंपोझिट मधील करणारे २२ कामगारांचे किमान वेतना करिता उपोषण करण्या करिता बसले होते .
उपोषणाची याची दखल घेत हिंदुस्थान कम्पोजिट चे मॅनेजमेंट चे जनरल मॅनेजर गुणवंत तपासे, विनय भालेराव HR हेड , हे दिनांक 05 /10/ 2023 ला त्यांच्या मागण्या बद्दल चर्चा करण्याकरिता आले होते परंतु 5 तारखेला चर्चेतील मार्ग निघू शकला नसल्याने चर्चा पुढे गेली नाही . अखेर कामगारांच्या वतीने उपोषणाचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी मॅनेजर व कामगारांच्या तडजोडी मध्ये अकुशल कामगाराचे वेतना करिता कंपनी यांनी होकार दिला या निर्णयामुळे उपोषणात बसलेल्या 22 कामगारांना त्याच्या कारखाने अधिनियम १९४७ च्या कलम २ पोट कलम (एफ ) च्या कारखाने नियमा नुसार किमान वेतन देत कामगारांच्या किमान वेतना मध्ये वाढ होत आहे . आज जरी सर्वांना फायदा झाला नसला तरी याचा फायदा 14 कामगारांना होणार आहे आन्दोलनामुळे १४ कामगारांना याचा मोठा फायदा होणार असल्याने हे आपल्या आंदोलचे यश आहे हे समजवून सांगितल्या नंतर कामगारांना कंपनीच्या वतीने आलेल्या मॅनेजर गुणवंत तपासे यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिला व उपोषणाला जूस पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.
उपोषणाला जास्त काळ चिडघु न दिल्याने उपोषणाला नेतृत्व करणाऱ्याचे गुणवंत तपासे यांनी आभार व्यक्त केले,
यात
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम, व युवा स्वाभिमानी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सचिन एस. मेश्राम, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा प्रमुख सुरज निंबार्ते, हे चर्चेत सहभागी होते सोबत उपोषणाला बसलेले 22 कर्मचारी देखील होते यात सुरज दुबे, संजय हटवार, अतुल चोपकर, अमित खेडीकर, समिर मस्के, मुकेश कोल्हे, मनोहर दारवाटे, सोमेश खोत, श्रीधर भोयर, हर्षिल मेश्राम, सुरज टेंभुर्णे, मंगेश गिदमारे, वासुदेव राखडे, सेवक तुरस्कर, ईश्वर लोंदासे, प्रशांत बांते, स्वप्नील शेंडे, अविनाश झलपुरे, भूषण मदणकर, फजल खान, अतुल कुंभलकर, नितेश शेंडे,हे उपोषणाला बसले होते . या उपोषणाला नेतृत्व करणारे शरद पवार गटाचे भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष याचा कुशल नेतृत्व मुळे लवरात लवकर उपोषनाची सांगता झाली असे वक्त्याव्य आपल्या आभारा कामगार नेते संजय हटवार यांनी सांगितले