ज्युटपासुन विविध बॅग निर्मीतीचे प्रशिक्षण
इच्छुकांनी मुलाखतीला उपस्थित राहावे
भंडारा,दि.5 : बैंक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार रोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) भंडारा,संस्थेद्वारा निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचे 11 ऑक्टोबर 2023 पासून जुट पासुन विविध उत्पादने तयार करण्याचे तेरा दिवसीय प्रशिक्षण सुरू होत आहे.
या प्रशिक्षणामध्ये मनी पर्स ,डिझाईन हॅन्ड बॅग, साईड बॅग, ऑफिस बॅग,शॉपींग बॅग,ऑफिस फाईल, डायनिंग टेबल मॅट, हॅन्गीग बॅग, फलॉवर पॉट ,परदे कि-चेन इत्यादी व कर्ज विषयक मार्गदर्शन करण्यात येईल. उद्योजकीय कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल, व्यवसायची संधी, बाजार सर्वेक्षण बॅकेच्या योजना या बद्दल मार्गदर्शन दिले जाईल. प्रशिक्षण प्रवेशाकरिता आयोजित मुलाखतीकरिता येताना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला तसेच गुणपत्रिका, रेशनकार्ड, आधार कार्ड, मनरेगा कार्ड,जॉब कार्ड, सोबत आणणे आवश्यक आहे.
या प्रशिक्षणा दरम्यान जेवन,चहा,नाश्ता, राहणे आदीची सोय मोफत केली जाईल. रोजगाराची आवड व्यवसाय करण्याची तयारी असणा-या व वय 18 से 45 वर्ष दरम्यान असणा-या युवक –युवती ,पुरूष व महिलांनी मुलाखतीकरीता बुधवार 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10. वाजता बि.ओ.आई.स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था,आरसेटी बिल्डींग, लालबहादुर शास्त्री, मनरो शाळेच्या बाजुला शास्त्री चौक,भंडारा येथे उपस्थित राहवे,असे आवाहन स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था,भंडारा यांनी कळविले आहे.